आत्मनिर्भर म्हणजे आत्मविश्वास – पंतप्रधान मोदी

Spread the love


नवी दिल्ली : देशाचा आज ७४वा स्वातंत्र्यदिवस आहे. सलग सात वर्ष पंतप्रधान नरेंद्र लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत. यावेळी देशाला संबोधित करताना त्यांनी आत्मनिर्भर भारतावर अधिक जोर दिला. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे, असं म्हणत त्यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे कल असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे देशातील नागरिकांचं मनोबळ देखील वाढवलं. 

ते म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. ज्या गोष्टी कुटुंबासाठी आवश्यक आहेत, त्याच गोष्टी देशासाठी देखील आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे.’ असं मोदी म्हणाले. 

त्याचप्रामाणे अनेक कच्चा माल भारत इतर देशांना देत असतो त्यानंतर पुन्हा त्याच कच्च्या मालावर प्रक्रिया करून आपण तो माल विकत घेतो. असं न करता भारत पूर्णपणे विकसनशिल बनू शकतो असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करुन आसनव्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *