घरबसल्या मागवता येणार औषधं; Amazonकडून ऑनलाईन फार्मसी स्टोर लॉन्च

Spread the love


बंगळुरु : ई-कॉमर्स e-commerce कंपनी अमेझॉन इंडियाने Amazon India ऑनलाईन फार्मसी online pharmacy store लॉन्च केलं आहे. ऑनलाईन फार्मसी या सेवेद्वारे सुरुवातीला केवळ बंगळुरु येथेच औषधं पुरवली जातील. त्यानंतर इतर शहरांमध्ये ही सेवा लॉन्च करण्यात येणार आहे. 

अमेझॉनच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी सांगितलं की, ‘कंपनी आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे. सध्या बंगळुरुमध्ये अमेझॉन फार्मसी लॉन्च करण्यात येत आहे. याद्वारे ग्राहक प्रिस्क्रिप्शन आणि ओव्हर-द-काउंटर आधारित औषधं घरी बसून ऑर्डर करु शकतात. या सेवेअंतर्गत ग्राहकांना औषधं, बेसिक हेल्थ डिवाइसेज आणि प्रमाणित विक्रेत्यांमार्फत आयुर्वेद औषधं उपलब्ध करुन दिली जातील. कोरोना काळात ही सेवा ग्राहकांसाठी मदतशीर ठरेल.’

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात, ग्राहक सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता आता ऑनलाईन कन्स्लटेशन, उपचार आणि औषधांच्या होम डिलिव्हरीकडे अधिक जोर देत आहेत. त्यामुळे अमेझॉननेही आपला व्यावसाय वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. कोरोना काळात औषधांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अमेझॉनने आता मेडिकल सेक्टरमध्येही पाऊन टाकलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ओव्हर-द-काउंटर आणि प्रिस्क्रिप्शन आधारित औषधं, मूलभूत आरोग्य उपकरणं यासह सर्व भारतीय हर्बल औषधं अ‍ॅमेझॉन फार्मसी Amazon Pharmacy सर्व्हिसवर उपलब्ध असतील. 

कोरोनो व्हायरस  coronavirus काळात Amazon Indiaने भारतात आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमेझॉन देशाच्या विविध भागात 10 नवे फुलफिलमेंट सेंटर fulfillment centers सुरु करत आहे. हे सेंटर दिल्ली, मुंबई, बंगळुरु, पटना, लखनऊ, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, लुधियाना आणि अहमदाबाद येथे सुरु करण्यात येणार आहेत. 

 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *