जम्मू-काश्मीर : चार दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला मोठे यश

Spread the love


श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आज शुक्रवारी चार दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले आहे. जिल्ह्यातील किलूरा भागात झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाल्याच्या वृत्ताला जम्मू-काश्मीर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

शकूर पॅरी अल बद्र आणि सुहेल भट ( Shakoor Parray Al Badr and Suhail Bhat) अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. आयजीपी काश्मीरने (IGP Kashmir ) हे दहशतवादी ठार झाल्याचे  स्पष्ट केले आहे. खानमोहच्या पंचचे अपहरण करून ठार मारणारा अतिरेकी शकूर पर्रे अल बद्र हा जिल्हा कमांडर आणि आणखी एक दहशतवादी सुहेल भट चकमकीत ठार झाला आहे.

काश्मीर झोनचे पोलीस यांनी सांगितले की, दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांबरोवर जोरदार चकमक सुरु होती. त्यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले. त्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोपियन एन्काऊंटरमध्ये हे दोन दहशतवादी ठार झाले. भारतीय सैन्याने परिसराला वेढा घातला होता. त्यानंतर जोरदार गोळीबार दहशतवाद्यांकडून करण्यात आला. यावेळी भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार केल्याची घटना किलूरा गावच्या सफरचंद बागेत घडली. यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने सापला लावला होता. यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलीस, ४४आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने किलूरा येथे एक शोध-शोध-मोहीम सुरू केली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

शोध पथकाच्या संयुक्त पथकाने दहशतवादी लपून बसलेल्या संशयित क्षेत्राला घेराव घातला होता, तेव्हा दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार केला आणि त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. संयुक्त सुरक्षा दलाचे पथक दहशतवादी लपलेल्या ठिकाणी कसून शोध घेत आहेत. यावर्षी काश्मीरमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या प्रमुख २६ दहशतवादी कमांडरांसह बहुतेक दक्षिण काश्मीरमध्ये दीडशेहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *