जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला; काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन: बाळासाहेब थोरात

Spread the love


मुंबई :  नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा निर्धारित वेळेतच होणार आहे. पण याला अनेक विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट देखील जाहीर केली आहे. शिक्षण मंत्रालयाने जेईई परीक्षेसाठी ६६० सेंटर आणि नीट परीक्षेसाठी ३८४३ सेंटर जाहीर केले आहेत. जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी शिफ्ट ८ वरुन १२ करण्यात आल्या आहेत.

जेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड रिलीज करण्यात आले असून नीट 2020 परीक्षांसाठी देखील या आठवड्यात अॅडमिट कार्ड रिलीज होण्याची शक्यता आहे. जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नसल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी होत आहे. परीक्षा जास्त वेळ टाळू शकत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता यावरुन नवीन राजकीय संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.

‘कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी उद्या शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

‘दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे.’ असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *