देशात २४ तासांत कोरोनाचे ६४५५३ नवे रुग्ण, १००७ रुग्णांचा मृत्यू

Spread the love


मुंबई : देशभरात एका दिवसांत कोरोनाबाधित ६४,५५३ रुग्ण आढळले आहेत. यानुसार आता पर्यंत २४,६१,१९० एवढा कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे. गेल्या २४ तासांत १००७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत देशातील १७,५१,५५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७०.७७ इतकी आहे. तर संक्रमणामुळे मृत्यूदरात घट झाली असून १.९६ टक्के इतका आहे. 

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १००७ जणांचा मृत्यू 
गेल्या २४ तासांत संक्रमितांचा आकडा ६४,५५३ वाढला 
एकूण कोरोनाबाधित २४६११९० 
आतापर्यंत कोरोनाबाधितांचा मृत्यू ४८०४०
आतापर्यंत ऍक्टिव केस ६,६१,५९५ इतका आहे 
बरे झालेले रुग्ण १७,५१,५५५

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. २ करोड ८ लाखहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तेथेच ७ लाख ४८ हजार नागरिकांनी आपले प्राण गमावले आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ६० हजारच्या जवळ आहे. तर ब्राझिलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ३१ लाख ७० हजार इतका आहे. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *