पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिनबद्दल दिली ही गुड न्यूज

Spread the love


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर देशाला आत्मनिर्भर भारतची साद दिली. आरोग्य, शिक्षण, संरक्षण, रोजगार अशा विविध क्षेत्रात देशात प्रगती करत असल्याचे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात सांगितले. यावेळी देशावर असलेल्या कोरोना संकटावर पंतप्रधान काय बोलणार यावर साऱ्यांचे लक्ष लागले होते. पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिन संदर्भातील शंकांचे निरसन केलंय. त्यामुळे कोरोना वॅक्सिनबाबत भारत लवकरच आत्मनिर्भर होईल असा विश्वास देशभरातून व्यक्त होतोय.

कोरोनाच्या वॅक्सिनवर देशातील वैज्ञानिक ऋषीमुनीप्रमाणे तपस्या करत आहेत. वॅक्सीनचे काम मोठ्या पातळीवर सुरु आहे. तीन वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यावर आल्या आहेत. वैज्ञानिकांची अनुमती आल्यावर हे वॅक्सिन देशभरात पोहोचवले जाईल. हे वॅक्सिन शेवटच्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचेल याची सर्व व्यवस्था केल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

कौशल्यवृद्धी म्हणजे आत्मनिर्भर भारत…आत्मनिर्भर म्हणजे आत्मविश्वास आहे. भारत अंतराळ क्षेत्रातही आत्मनिर्भर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर कृषी आत्मनिर्भर शेतकरीचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. बंधनातुन शेतकऱ्यांना मुक्त केलं असून शेतकरी कुठेही शेतमाल विकू शकतात असे ते म्हणाले. श्रमाला प्रतिष्ठा द्या. श्रमिकांनी स्वत:चा कौशल्य वाढवा असे आवाहनही त्यांनी केले. 

६ लाखाहून अधिक गावांमध्ये हजारो लाखो किलोमीटर ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे काम करण्यात येणार आहे. बदलत्या युगात सायबर स्पेसची गरज वाढलीय. अशावेळी सायबर सुरक्षा देखील खूप महत्वाची आहे. नवी सायबर सुरक्षा निती आणणार असल्याचे ते म्हणाले.

भाषणातील महत्वाचे मुद्दे

देशाच्या प्रगतीचं गौरवगान करुया 

व्होकल फॉर लोकल हा नवा संकल्प 

व्यापाराला चालना देणार 

जनधन योजनेचा गरिबांना फायदा

जलजीवन मिशनला एक वर्ष पूर्ण 

पिण्याचं पाणी हा सर्वांचा हक्क 

परकीय गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडले 

देशातल्या सुधारणांवर भर द्या 

जलजीवन योजना राज्याराज्यात लागू 

अखेरच्या स्तरापर्यंत पाणी योजना 

विकासयात्रेत मागे राहीलेल्या ११० जिल्ह्यांना सर्वांच्या बरोबरीने पुढे आणणार. 

मल्टीनोडेल कनेक्टीव्हीटी इन्फ्रा 

संकटाला तोंड देण्यास भारत सज्ज

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *