बॉलीवुडमध्ये असा होतो ड्रग्ज सप्लाय, जाणून घ्या वास्तव

Spread the love


नवी दिल्ली : बॉलीवुडमध्ये ७० टक्क्यांहून अधिक कलाकार अमली पदार्थांच्या आहारी असल्याची धक्कादायक माहिती इन्फॉर्मरने झी न्यूजला दिलीय. सिने जगतातील मोठ्या हस्ती, छोट्या पडद्यावरील कलाकारांचा यात समावेश आहे. गांजा खरेदी करण्यासाठी कोड वर्ड वापरला जातो. महागड्या गांजाचा कोडवर्ड ‘डबीज’ तर ड्रग्ज पेडलर्सचे नाव एके ४७ असल्याची माहिती त्याने झी न्यूजला दिली. 

पेडलर्स फिल्मी जगतात ड्रग्ज पोहोचवतात. ब्लू बेरी कूश आणि स्टॉबेरी कूश हे गांजाचे प्रकार आहेत. हा गांजा ५ हजार रुपये प्रति ग्रॅम किंमतीत मिळतो. सिने जगतात नशेचे सामान पोहोचवण्यासाठी वांद्र आणि जुहूमध्ये पेडलर्स सक्रीय असल्याचेही त्याने सांगितले.

मुंबईत ड्रग्ज व्यवसायात दोन मोठी नाव आहेत. दक्षिण मुंबईत चिंकू पठाम आणि वांद्रे जुहू सारख्या पॉश एरियात इम्मा नावाच्या व्यक्तीचे मोठे नेटवर्क आहे. तसेच फिल्म सिटी परिसरात मीराजचे नेटवर्क सक्रीय आहे. ड्रग्जच्या व्यवसायात काही महिला देखील सहभागी असल्याची माहिती देखील त्याने दिली.

महाग अमली पदार्थ विदेशातून किंवा गुजरात, पंजाबमधून मुंबईत रस्त्यामार्गाने येतात. शहरातील मोठ्या पेडलर्सकडे हे पोहोचल्यानंतर छोट्या पेडलर्सना हे रिटेल क्वांटीटीमध्ये दिले जातात. फिल्मी जगतातील लोकं मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकत घेतात असेही त्याने सांगितले. 

या इन्फॉर्मरने झी न्यूजला दिलेल्या एक्सक्लूझीव मुलाखतीत ही माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याची ओळख लपवण्यात आलीयं.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *