…म्हणून पीयूष गोयल होणार रूग्णालयात दाखल

Spread the love


नवी दिल्ली : रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यावर मुतखड्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. खुद्द पीयूष गोयल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ट्विटरवर ट्विट करत त्यांनी शस्त्रक्रियेची माहिती दिली नाही आहे. शिवाय लवकरच आपण रूग्णालयातून परत येवू असं देखील ते म्हणाले आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर गोयल यांच्याकडे ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण खात्याची जबाबदारी देण्यात आली. 

ट्विट करत ते म्हणाले, ‘मला मुतखडा काढण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागणार आहे. मात्र लवकरच परत येईन.’ नुकताच पीयूष गोयल यांनी प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, राजधानी, शताब्दीसह तेजस आणि हमसफर गाड्या देखील पुन्हा रेल्वे रुळावर धावणार आहेत. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत राजधानी, शताब्दी, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. 

दरम्यान, सणांच्या काळात सर्वच जण आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. याच पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये प्रवाशांची अधिक गर्दी होवू नये आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळावा यासाठी रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *