…यासाठी अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली परवानगी

Spread the love


मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘रामसेतु’ या चित्रपटाच्या शुटिंगसाठी इच्छा व्यक्त करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे परवानगी मागितली आहे. आदित्यनाथ यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर अक्षय अयोध्यामध्ये त्याच्या चित्रपटाचं शुटिंग सुरू करणार आहे. सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये अक्षय कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बैठक झाली होती. 

या बैठकीमध्ये अक्षय कुमारने चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अक्षय कुमार यांनी योगी आदित्यनाथ यांनी राज्यात फिल्म सिटी सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. 

दरम्यान, अक्षय साकारत असलेल्या सामाजिक चित्रपटाचे योगी आदित्यनाथ यांनी कौतुक देखील केले. शिवाय अक्षयने योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे आभार मानले. 

‘रामसेतु’ चित्रपटाचा पोस्टर अक्षयने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला. अक्षयने पोस्ट केलेला पोस्टर अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार अक्षयला त्याच्या आगामी चित्रपटासाठी परवानगी देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *