रेल्वेची मार्गदर्शक तत्त्वे जारी, प्रवासापूर्वी जाणून घ्या नियम, अन्यथा…

Spread the love


मुंबई : रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) सण आणि उत्सव लक्षात घेऊन रेल्वे प्रवाश्यांसाठी कोविड -१९ साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरपीएफने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, कारण सणासुदीच्या काळात गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या सामान्यपेक्षा खूपच जास्त असणे अपेक्षित आहे. त्यामुळे गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी कोविड मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

प्रोटोकॉल तोडणार्‍यांवर कडक कारवाई

रेल्वेने स्पष्ट केले आहे, प्रवाशांना प्रवासादरम्यान निष्काळजीपणाने वागाल तर खबरदार, असा इशारा दिला आहे. कोविड-१९ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने जारी केलेल्या या नियमांचे पालन करावे लागेल. जर कोणी रेल्वेच्या नियमांविरूद्ध काही पाऊल उचलले तर आरपीएफ त्याविरूद्ध कठोर कारवाई करू शकते. म्हणूनच,  रेल्वे सुरक्षा दलाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काळजीपूर्वक वाचन करणे आणि कोविड-१९  हेल्थ प्रोटोकॉलचे अनुसरण करणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रवासात या गोष्टी लक्षात ठेवा

रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील प्रत्येक प्रवाश्याला मास्क घालणे बंधनकारक आहे. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक असेल. कोविड पॉझिटिव्ह घोषित झाल्यानंतर रेल्वे क्षेत्रात किंवा स्थानकात किंवा रेल्वेमध्ये चढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. रेल्वे मार्गदर्शक सूचनांनुसार मास्क न घालणे किंवा मास्क अयोग्यपणे न घालणे, फिजिकल योग्य अंतर न पाळणे, रेल्वेत आणि रेल्वे स्टेशनवर थुंकणे, रेल्वे स्टेशनवर उशिरा पोहोचणे, कोरोनाबाबत तपासनी न करता रेल्वेमध्ये चढणे किंवा स्थानकात आले तर ते रेल्वे मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन असेल असे समजे जाईल.

आरोग्य पथकाच्या परवानगीशिवाय प्रवेश नाही

आरपीएफने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर एखाद्या प्रवाशाने कोविड-१९ चाचणीसाठी आपला नमुना दिला असेल. परंतु त्याला तपासणीचा अहवाल मिळालेला नाही. मात्र, तो रेल्वेमध्ये प्रवास करत असेल किंवा प्लॅटफॉर्मवर सापडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या आरोग्य पथकाच्या परवानगीशिवाय रेल्वेमध्ये चढणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

नियम मोडला तर शिक्षा होणार 

सण, उत्सवादरम्यान, प्रवास करताना आरपीएफने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणारे प्रवासी, रेल्वे अधिनियम १९८९. (Railway Act 1989) च्या कलम १४५, १५३ आणि १५४ अंतर्गत कैद किंवा दंड आकरण्यात येईल, किंवा दोन्ही शिक्षा होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.  

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *