लाखो करदात्यांसाठी इनकम टॅक्स विभागाची दिवाळी भेट

Spread the love


नवी दिल्ली : देशातील (Income Tax Department) इनकम टॅक्स विभागाकडून दिवाळीच्या आधीच करदात्यांसाठी दिवाळीची भेट देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT)नं आपल्या ३८.११ लाख करदात्यांना 1,23,474 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा परतावा देण्याचं स्पष्ट केलं आहे. 

इनकम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार हा परतावा 1 एप्रिल 2020 ते 13 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या कालावधीतील असेल. यामध्ये 36.21 लाख जणांना देण्यात आलेला 33442 कोटी रुपयांचा  पर्सनल इनकम टॅक्स (Personal Income Tax) आणि 90,032 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स (Corporate Tax) समाविष्ट आहे. 

इनकम टॅक्स विभागाच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केल्यानंतरपासूनच परताव्याच्या प्रक्रियेला गतीमान करण्यात आलं आहे. परिणामी यंदाच्या वर्षी कोणालाही आयकर विभागाकडे परताव्यासाठीची विनंती करावी लागणार नाही. 

CBDT नं सांगितल्यानुसार परतावा न मिळालेल्यांनी ताबडतोब ई- मेलवर उत्तर द्यावं. जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर परतावा मिळू शकणार आहे. परताव्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातच असणार आहे. परताव्याबाबतच जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. 

-करदाते त्यांच्या कराच्या परताव्याबाबत जाणू इच्छत असल्यास त्यांनी सर्वप्रथम इनकम टॅक्स विभागाच्या  www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

– इथं युजर आयडी आणि पासवर्ड देऊन लॉगइन करावं. 
– त्यानंतर ‘View Returns/Forms’ वर क्लिक करावं. 
– पुढं ‘Income Tax Returns’  वर क्लिक करावं. 
– नंतर ऍक्नॉलेजमेंट नंबरवर क्लिक करावं. जे एका हायपरलिंक स्वरुपात असेल. तिथं FY 2019-20, असेसमेंट इयर AY 2020-21 निवडा. 

 

तिथंच खालच्या बाजूला तुम्हाला परताव्याबद्दलची माहिती दिसेल. ज्यामध्ये ‘मोड ऑफ पेमेंट’ आणि क्लियरंस डेट, रक्कम नमूद केलेली असेल.  

 





Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *