शोपियामध्ये रात्रीपासून एन्काऊंटर सुरु, दोन दहशतवादी ठार

Spread the love


काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. शोपिया जिल्ह्याच्या सुगन गावामध्ये रात्री उशीरापासून दोघांमध्ये चकमक सुरु होती. आज सकाळी जवानांना यात यश आलं असून दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. 

दोन अज्ञात दहशतवाद्यांना मारल्याच्या वृत्ताला काश्मीर पोलीस आयजींनी दुजोरा दिलाय. सध्या तिथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. चकमकीसंदर्भात अधिक माहिती दिली जाईल असेही ते म्हणाले. 

ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून बंदूक आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण त्यांनी दुसरीकडून गोळीबार सुरु केला. जवानांनी याचे उत्तर फायरिंग करुन दिले. आणि झालेल्या चकमकीत दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 





Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *