सीबीआयची हे अधिकारी करणार सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास

Spread the love


मुंबई : सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विजय मल्ल्या, कोळसा घोटाळा आणि अगस्ता वेस्टलँड प्रकरण यासारख्या हाय प्रोफाइल प्रकरणांची सीबीआयच्या विशेष टीमने चौकशी केली आहे. या पथकाने दुबईहून अगस्ता वेस्टलँड प्रकरणातील मध्यस्थी ख्रिश्चन मिशेलचे यशस्वीरित्या प्रत्यार्पण केले होते. आता ही टीम सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

१. मनोज शशीधर, सहसंचालक, सीबीआय

मनोज हे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. ते 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या शशीधर हे सीबीआयचे सहसंचालक आहेत. शशीधर यांनी अहमदाबादची गुन्हे शाखा, वडोदराचे पोलीस आयुक्त, अहमदाबादचे सह पोलीस आयुक्त आणि गुजरातमधील पाच जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून त्यांना सीबीआयकडे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. सीबीआयमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी बेकायदा खाण घोटाळा, विजय मल्ल्या प्रकरण, अगस्ता वेस्टलँड आणि इतर संवेदनशील राजकीय बाबींवर देखरेख ठेवली आहे. गुजरातमध्ये पोस्टिंगच्या वेळी त्यांनी अनेक खून प्रकरणांवर तपास केला आहे.

२. गगनदीप गंभीर, डीआयजी, सीबीआय

पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये अव्वल आलेल्या गगनदीप गंभीर या 2004 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या गुजरात कॅडरच्या आयपीएस आहेत. गगनदीप यांनी राजकोटसह अनेक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. 2016 पासून त्या सीबीआयमध्ये आहेत. अनेक हाय प्रोफाइल प्रकरणात तपास पथकाचा त्या एक भाग आहेत. गंभीर यांनी विजय मल्ल्या, अगस्ता वेस्टलँड घोटाळा, बेकायदा खाण घोटाळा यासारख्या प्रकरणांची चौकशी केली होती. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही चौकशी सुरू आहे. श्रीजन घोटाळा आणि पत्रकार उपेंद्र राय यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यांचा तपासही गंभीर यांनी केला आहे.

३. नुपूर प्रसाद, एसपी, सीबीआय

नुपूर प्रसाद या एजीएमयूटी केडरच्या 2007 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. नुपूर या मूळच्या बिहारच्या टिकारी येथील सलेमपुर गावचा आहेत. त्या दिल्लीतील शाहदराच्या डीसीपी देखील राहिल्या आहेत. सीबीआयच्या सुपरकॉप म्हणून त्यांना ओळखले जाते. खून आणि ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यांच्या अनेक घटनांचा तपास त्यांनी केला आहे. गेल्या वर्षी नुपूर यांची सीबीआयमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. अगस्ता वेस्टलँड घोटाळा आणि विजय मल्ल्या प्रकरणाची चौकशी करणार्‍या पथकाचा त्या एक भाग आहेत. महिला आरोपीची चौकशी करण्यात त्यांचं कौशल्य आहे.

४. अनिल यादव, अतिरिक्त एसपी, सीबीआय

अनिल यादव सीबीआयमध्ये अतिरिक्त एसपी आहेत. कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, अगस्ता वेस्टलँड, शोपियां बलात्कार प्रकरण आणि विजय मल्ल्या प्रकरणातील तपास पथकात त्यांचा सहभाग होता. एमबीबीएस विद्यार्थी नम्रता दामोरे यांच्या मृत्यूचीही त्यांनी चौकशी केली. ही तीच विद्यार्थिनी होती जिचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला होता. अनिल यादव मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये ते तपास अधिकारी म्हणून काम करणार आहेत. 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनी अनिल यादव यांना पोलीस पदक देण्यात आले आहे.

५. सुवेझ हक, डीआयजी, सीबीआय

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील सीबीआय चौकशीत एक अधिकारी महत्वाची भूमिका बजावेल. त्यांचे नाव सुवेझ हक आहे. ते सीबीआयमध्ये डीआयजी पदावर आहेत. या प्रकरणात डीआयजी सुवेझ हक यांची सीबीआय आणि मुंबई पोलिसांमधील नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2005 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. 2018 मध्ये त्यांची सीबीआयमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या वेळी ते पुणे ग्रामीणचे एसपी होते. 2015 मध्ये शीना बोरा खून प्रकरणाच्या चौकशीतही त्याचा सहभाग होता. मुंबई पोलिसात असताना त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाच्या आरोपीला अटक केली होती.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *