सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन, हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस

Spread the love


पणजी, गोवा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीने नोटीस बजावली आहे. ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुंबईतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यासाठी गौरव आर्याला सांगण्यात आले आहे. गोव्यातल्या त्याच्या हॉटेलच्या गेटवर ही नोटीस लावण्यात आली आहे. गोव्याच्या गौरव आर्याने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. गौरव हा गोव्यातील हॉटेल व्यवसायीक असून, अंजुना इथे टॉमरेड हॉटेल चालवतो.

 #SushantSinghRajputDeathCase :  सुशांतसिंह राजपूत आत्हमत्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ, ड्रग्ज डिलर्स यांचीवे समोर आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती म्हणजेच सुशांतची मैत्रिण हिच्या WhatsApp चॅटमुळे आणखी खळबळजनक खुलासा झाला आहे. ड्रग्ज डिलर गौरव आर्यासोबतचे रियाचे बोलणे सध्या व्हायरल झाल्यामुळे SushantSinghRajputDeathCase ला एक वेगळं वळण मिळाले आहे. 

समोर आलेल्या या WhatsApp chatमध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रगविषयी विचारताना दिसत आहे. ‘आपण स्ट्राँग ड्रग्जविषयी सांगावं तर, मी कधी त्यांचा वापर केलेला नाही’, असं रियाचं २०१७ मधील बोलणं समोर आले होते. एमडीबाबत तुला काही ठाऊक आहे का, असेही तिने विचारल्याचे कळत आहे. 

जया साहा नावाच्या एका व्यक्तीशीही ड्रग्जबाबत रियाचे बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. ही व्यक्ती रियाच्या मित्रमंडळींपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. २०२० च्या एप्रिल महिन्यास सॅम्युअल मिरांडा आणि रियामध्ये झालेले बोलणंही अनेक मुद्द्यांना अधोरेखित करत असल्याचे दिसून येत आहे.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *