सैनिकांसाठी नॉन बुलेटप्रुफ वाहने, पंतप्रधानांना ८४०० कोटींचे विमान – राहुल गांधी

Spread the love


नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सीमेवर जाणाऱ्या सैनिकांसाठी नॉन बुलेटप्रुफ वाहने तर पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचे अत्याधुनिक विमान करण्यात आले आहे. सैनिकांमधील असंतोष दर्शवणारा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विट  केला आहे. हाच काय तो न्याय आहे का, असा सवाल राहुल यांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपींसाठी विमान खरेदी करण्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.  राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून जवानांना शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान…हा न्याय आहे का ?,  केंद्र सरकारकडून पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी विमानांवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. 

गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी पंजाबमधील कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी आयोजित सभेत बोलतानाही हा मुद्दा उपस्थित केला होता.  एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८००० कोटींची दोन विमाने खरेदी केली आहेत. दुसरीकडे चीन आपल्या सीमेवर आहे आणि सुरक्षा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी थंडीचा सामना करत आहेत.

राहुल गांधी यांना शेतकरी आंदोलनावेळी ज्या ट्रॅक्टवर बसले होते, त्याच्यावर गादी होती असे विचारण्यात आले होते. त्यावेळी ते  म्हणाले, मोदींनी ८००० कोटींची दोन विमाने खरेदी केली. त्यात तर पलंग आहे.  

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *