सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर

Spread the love


मुंबई : सोन्याच्या दरामध्ये शुक्रवारी जोरदार घसरण पाहायला मिळाली. मागणी कमी झाल्याने सोने व्यावसायिकांनी दर कमी केले. यामुळे शुक्रवारी बाजारात ०.२ टक्के घट झाली. सोन्याचा दर ४९ हजार ८०६ रुपये प्रति १० ग्राम राहीले. 

एमसीएक्समध्ये ऑक्टोबरमध्ये डिलीव्हरी झालेल्या सोन्याची किंमत ९८ रुपये म्हणजेच ०.२ टक्क्यांच्या घटसह ४९ हजार ८०६ रुपये प्रति १० ग्रॅम राहीले. यामध्ये ४,२१९ लॉटसाठी व्यवसाय झाला. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव ०.०९ टक्क्याहून खाली येऊन १,८७५.३० डॉलर राहीला. 

इंदौरमध्ये स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी सोनं १२५ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीचा भाव १२५० रुपये प्रति किलोग्रॅम पाहायला मिळाला. सध्याच्या व्यापारात सोनं सर्वाधिक ५०,७५० च्या खाली ५०,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी वर ५८,००० आणि खाली ५७,८००० रुपये प्रति किलो ग्रॅम विकली गेली. सोना ५० ६५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ५७, ९०० रुपये प्रति किलोग्रॅम आणि चांदीची नाणी ७२५ रुपये प्रति नग राहीली. 

गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ४८५ रुपये नुकसानी सोबत ५०, ४१८ रुपये प्रति १० ग्राम राहीली. HDFC सिक्युरीटीजच्या म्हणण्यानुसार, आदल्या दिवशी व्यवसाय ५०, ९०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. चांदी देखील २,०८१ रुपयांवर कमी होऊन ५८,०९९ रुपये प्रति किलोग्रॅमवर राहीली. मागच्या व्यावसायिक सत्रात ६०,१८० रुपये प्रति किलोग्रॅम होती. 

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमतीत कमी आल्याचे HDFC सिक्योरीटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. युरोपमध्ये कोरोना संक्रमण वाढल्याने आर्थिक गतिविधी मंदावल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झालीय. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *