Bharat Bandh LIVE : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, भारत बंद

Spread the love


ओडिशा । डावे राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भुवनेश्वर रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविली.

आंध्र प्रदेश। शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंद पाठिंबा देत डाव्या राजकीय पक्षांनी विजयवाड्यात आंदोलन केले, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात निदर्शने केलीत.

कोलकाता । भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिष्ट पार्टीच्यावतीने जादवपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

 

बंदचा परिणाम

पुणे । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक 

कडकडीत बंद

नवी मुंबई । भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीत आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामदारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी आहेत.

नवजीवन एक्सप्रेस मलकापूर येथे रोखली 

बुलडाणा । भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारनं तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना  रस्त्यावर उतरलीय.सकाळी ६.४० वाजता चेन्नई –  अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

पुण्यात दुकाने बंद

पुणे । शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) पुणे येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पुण्यात व्यापारी महासंघाने (Pune Chamber of Commerce) आपला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकानं दुपारी १२.३०पर्यंत बंद राहणार आहेत. तर आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार केवळ चर्चा करत आहे. तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांच्या (Farmers) या बंदला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे.

दरम्यान, १८ विरोधी पक्षांनी या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बंदमुळे दिल्लीसह इतर राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरकीडे केंद्र सरकारने २० शेतकरी संघटनांना सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पंजाबच्या २० शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची काल भेट घेतली. 

संवेदनशील भागात एसटी वाहतूक बंद

मुंबईत मात्र सर्व प्रकारची वाहतूक सुरूच राहणार आहे. बेस्ट बसेस ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिलीय. खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट बसेसना लोखंडाच्या जाळ्या बसवल्या जाणार आहेत. शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मुंबई परिसरातल्या टॅक्सीही सुरू राहणार असल्याची माहिती टॅक्सी संघटनांनी दिली आहे. तर  संवेदनशील भागात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

आंदोलनाला बँक संघटनांचा पाठिंबा 

शेतकरी आंदोलनाला बँक संघटनांनी पाठींबा दिला आहे. मात्र आज पुकारलेल्या भारत बंद दरम्यान बँका सुरूच राहणार आहेत. ‘भारत बंद’मध्ये बँकांचा सहभाग असणार नाही. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरुच राहाणार आहेत. 

राज्यातील  बाजार समित्याही मार्केट बंद

आजच्या भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूरमधील बाजार समित्याही आजच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *