CBSE Board Exams 2021 : जानेवारीत परीक्षा होण्याची शक्यता

Spread the love


नवी दिल्ली : देशात सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचं चित्र समोर येत आहे. यंदाच्या वर्षीच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांकडे  आता सर्वांचे लक्ष आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत लेखी परीक्षा घेतल्या जातील असं वक्तव्य केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केलं. शिवाय CBSE बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

यासंबंधी पोखरियाल १० डिसेंबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पोखरियाल बोलणार आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र लवकरच cbse.nic.in या संकेतस्थळावर जारी करण्यात येणार आहेत. जानेवारीत परीक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सीबीएसईच्या नियमित आणि बाहेरून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र वेगळ्या प्रकारे जारी करण्यात येणार आहेत. नियमित विद्यार्थी सीबीएसई (CBSE)च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपलं प्रवेश पत्र डाऊन लोड करू शकतात. 

त्यासाठी विद्यार्थांना सर्व प्रथम cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
– त्यानंतर  विद्यार्थ्यांनी ‘In Focus’ हा पर्याय निवडायचा आहे. 
– त्यानंतर ‘Admit Card 2021’ लिंकवर क्लिक करा.
– तुम्हाला Login पेज दिसेल, त्याठिकाणी विद्यार्थ्यांना यूजर आयडी (User ID), पासवर्ड (Password) आणि  सिक्योरिटी पिन (Security Pin) भरणं बंधनकारक असणार आहे. 
-त्यानंतर Login या पर्यायावर क्लिक करा. 
– तुम्हाला तुमचं प्रवेश पत्र मिळेल. हवं असल्यास तुम्ही प्रवेश पत्राची प्रिंट देखील काढू शकता.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *