Gold Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी स्वस्त

Spread the love


नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण होताना दिसतेय. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय. कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) येणाऱ्या बातमीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसतंय. 

सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ रुपयांनी कमी होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव सरासरी १,७८१, ५० डॉलर होता. 

सोन्याच्या दराप्रमाणे चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. चांदीचा आजचा भाव ५७ हजार ८०८ रुपये आहे. याआधी चांदीचा भाव ५८ हजार ५०९ रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाले. आधीच्या व्यापारी सत्राच्या तुलनेत चांदी ७०१ रुपयांवर घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची घसरण सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी २२.२९ डॉलर पर्यंत आहे.

काय आहे कारण ?

सोन्या-चांदीच्या उतरत्या भावाचे कनेक्शन हे कोरोना वॅक्सीनच्या आगमनाशी जोडण्यात येतंय. कोरोना वॅक्सीन लवकर येईल अशी शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्यायत. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेत आहेत. येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती वाढतील असं दिसत नाहीय. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *