TIME : ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनातील महिलाना स्थान, लिहिले आहे की…

Spread the love


मुंबई : टाइम मॅगझिनने (TIME) आपल्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनातील ( Farmers Protests) सहभागी महिलांना (Women) विशेष स्थान दिले आहे. टाइम मासिकाने आपल्या कव्हर पेजवर भारतातील कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी आंदोलनात भाग घेणार्‍या महिलांची (Women Protests) दखल घेत त्यांना हा अंक समर्पित केला आहे. ज्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत आणि कित्येक महिन्यांपासून तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करीत आहेत.

नव्या आंतरराष्ट्रीय कव्हरवर ही टॅगलाइन

टाइम मासिकाच्या नव्या आंतरराष्ट्रीय कव्हरवर एक टॅगलाइन देखील आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे – ‘मला घाबरवले आणि धमकावले जाऊ शकत नाही आणि विकत घेतले जाऊ शकत नाही.’ मासिकाच्या मुखपृष्ठावर काही महिला शेतकरी शेतकरी चळवळीत सहभागी असल्याचे चित्र आहे. ज्या महिला भारताच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करतात. त्यांच्यासह काही लहान मुलेदेखील दर्शविली आहेत.

कव्हर पेजवर असे दिसून येत आहे की काही महिला घोषणा देऊन सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध करत आहेत. यावेळी, एका महिलेच्या मांडीवरही एक मूल दिसून येते आणि तेथे एक किंवा दोन मुले आहेत. चित्रात वृद्ध महिला देखील आहेत.

टाइम मासिकाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे, “टाइमचे नवीन आंतरराष्ट्रीय कव्हर.” टाइम मासिकाच्या मुखपृष्ठात स्थान मिळालेल्या महिलांमध्ये 41 वर्षीय अमनदीप कौर, गुरमेर कौर, सुरजित कौर, जसवंत कौर, सरजित कौर, दिलबीर कौर, बिंदू अम्मान, उर्मिला देवी, साहुमती पाधा, हीराथ झाडे, सुदेश गोयत या महिला आहेत. या महिलांमध्ये अधिक महिला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.

शेतकरी आंदोलनावर विशेष लेख

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर टाइम मासिकाने विशेष लेख लिहिला आहे. महिला शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्प कसा केला, याबद्दल टाइम मासिकाने आपल्या लेखात लिहिले आहे. सरकारने त्यांना घरी जाण्यास सांगितले आहे. असे असताना या शेतकरी महिला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील हजारो शेतकर्‍यांचे नेतृत्व करत मोर्चा संभाळत आहेत, असे लिहिले आहे.

पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय आयकॉन आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींनी ट्विट केले तेव्हा भारतात सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला परदेशात मोठी प्रसिद्धी मिळाली. तथापि, नंतर हे स्पष्ट झाले की ग्रेटा थानबर्ग ही भारताविरूद्ध प्रचाराच्या कटाचा एक भाग होता, ज्याची अद्याप चौकशी चालू आहे.

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *