WHOची मोठी माहिती : केव्हापर्यंत येणार कोरोनाचं ‘कारगर व्हॅक्सीन’

Spread the love


मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. या दरम्यान व्हॅक्सीनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांच म्हणणं आहे की,’एक सुरक्षित आणि कारगर व्हॅक्सीन यावर्षाच्या शेवटापर्यंत तयार होऊ शकते.’ यासोबतच ते म्हणाले की, जगातील सर्व राजकीय मंडळींना व्हॅक्सीनचं समान वितरण करण्यास सांगितल्याचं म्हणाले. 

WHO च्या बैठकीत टेड्रोस म्हणाले की,’आपल्याला व्हॅक्सीनची गरज आहे. आशा आहे आपल्याला या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळेल. आपल्याला एकमेकांची गरज आहे. व्हायरसशी लढण्यासाठी खूप उर्जेची गरज आहे.’

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ९ कोरोना व्हॅक्सीन पाइपलाइनमध्ये आहे. त्यामुळे लस बाजारात आल्यावर त्याचं समान वाटप होणं हे आव्हान आपल्यासमोर आहे. आतापर्यंत १६८ देश या कोवॅक्स फॅसिलिटीत सहभागी झाले आहेत. फक्त चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंता वाढली आहे. सोमवारी तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. ‘जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.’ WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते. 

यासोबतच WHO ने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक खराब होण्याची चेतावणी दिली आहे. WHO च्या डॉ. मायकल रियान यांनी म्हटलं आहे की,’हे आकडे गावात आणि शहरात वेगवेगळे असू शकतात. तसेच वेगवेगळी वयोमर्यादा देखील असू शकतात. यानुसार, जगभरातील अधिकांना कोरोनाची लागण झाली असेल.’

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *